- 11/04/2022
- Dr. Pratik Patil
- 0 Comments
- Blog
फुफ्फुसाचा कॅन्सर : जागरूकता , समज आणि गैरसमज
सध्याच्या जीनोमीक आणि इम्युनोथेरपी या कॅन्सर च्या आजारांवर प्रभावी पणे कार्य करणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. फुफ्फुसाचा कॅन्सर हा सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोग मानला जातो. जगभरातील कॅन्सरच्या पाचपैकी एका रूग्णाचा मॄत्यू यामुळे होतो. दीर्घकालीन तंबाखू सेवन , धूम्रपान आणि नैसर्गीक कार्सीनोजेन च्या संपर्कामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. निश्चित पणे , थोरॅसीक आॉन्कोलॉजी मध्ये जे काम करतात त्यांना हे माहीत आहे की फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक धोकादायक आजार असू शकतो. परंतु सामान्य लोकांना जाणीव करून देण्यासाठी अथवा शिकवण देण्यासाठी याहून अधिक कार्य करणे आवश्यक आहे.
आरोग्य सेवेचे ओझे आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या दुष्परिणामांच्या संदर्भातील माहिती मध्ये मोठी तफावत असूनही, तंबाखूचा वापर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांच्यातील संबंधांबाबत ची व्यक्त होण्याची खुली मानसिकता यात अंतर पडते. या पार्श्वभूमीवर फुफ्फुसाचा कर्करोग असलेले अंदाजे १५ % रुग्ण कधीही धूम्रपान करत नसल्याची माहीती अस्तीत्वात असल्याचे आढळून येते. रूग्ण उपचार शोधण्यात टाळाटाळ करू शकतात , उपचार घेण्यास विलंब करु शकतात. आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत त्यांचा आजार प्रकट करण्यासाठी संकोच करु शकतात.
स्वनिरीक्षण - अत्यावश्यक बाब:
जे महिला-पुरूष स्पष्टपणे प्रत्यक्ष व प्रभावी धूम्रपान करतात आणि बहुतेक वेळा अप्रत्यक्षपणे धूम्रपान करतात , त्यांनी फुफ्फूसांच्या निगडीत जाणवत असलेल्या संकेतांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. आॉषोधोपचार असूनही खोकला , थुंकीतून रक्त पडणे , धाप लागणे , आवाजाच्या स्वरात बदल होणे आणि वजन नकळत कमी होत जाते , हे प्रमुख स्वयंस्पष्ट संबंधीत संकेत आहेत. यातील बहुतेक संकेत दीर्घकाळ टिकून राहतात. आजार , हाडे आणि इतर अवयवांत पसरल्या नंतर वेदना होऊ लागल्याने रूग्ण तज्ज्ञांकडे खूप उशीराने पोहोचतात. ब्रॉन्कोस्कोपी किंवा स्कॅन , टिश्यु बायोप्सी द्वारे वेळेवर निदान करून घेतल्यास रोग नियंत्रणासाठी त्वरीत शोध आणि उपचारपद्धती ची मदत मिळू शकते.
सल्ला:
५० वर्षाच्या व्यक्तीने २० किंवा अधिक वर्षे दररोज एक पॅक धूम्रपान केल्याचा इतिहास असेल तर फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणारे म्रुत्यूचे प्रमाण २०% पेक्षा जास्त असते. या जीवघेण्या आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर धूम्रपान कायमचे सोडून देण्याशिवाय कोणताही उत्तम पर्याय नाही.
समज - गैरसमज:
हा खरोखर दुख्खद , विनाशकारी आणि कलंक लावणारा गैरसमज आहे. सीडीसी नुसार , १०ते २० % रुग्णांनी कधीही धूम्रपान केलेले नाही. किंवा आयुष्यभरात १०० पेक्षा जास्त सिगरेट ओढलेल्या नाहीत. दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने सुमारे ७३०० म्रुत्यू धूम्रपान न करणारा मध्ये होतात आणि २९०० म्रुत्रु सहाय्यक रेडाॉन एक्स्पोजर मुळे होतात.
निश्चितच काही मार्ग आहेत. अगदी सुरुवातीलाच धूम्रपान ताबडतोब बंद करणे. धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्न करणारे प्रत्येकाला सहाय्य करण्यासाठी काही पुरावा आधारित उपाय आहेत. ज्यांना अप्रत्यक्ष किंवा निष्क्रिय धूम्रपानाच्या परिस्थितीमधून जावे लागते ( घरी किंवा कामाच्या ठिकाणी ) त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता २०ते ३० % नी वाढते.
नाही ! हे अजिबात खरं नाही. जरी फुफ्फूसांच्या कर्करोगाचे अर्ध्याहून अधिक रूग्ण ६५ हून अधिक वयाचे आहेत , तरी ही ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण रुग्णांना विशेषत महिला रुग्णांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो आहे , असे दिसून येते.
प्रदूषणा मूळे फुफ्फूसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो , हे निश्चितच सिध्द झाले आहे. नायट्रोजन डायॉक्साईड , नायट्रोजन आॉक्साइड , सल्फर डायॉक्साईड आणि सूक्ष्म कण यांचा फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या धोक्याशी स्पष्टपणे संबंध आहे. असे असले तरी प्रदुषण आणि धूम्रपान यातील तीव्रतेची तुलना करणे कठीण आहे. दूषित शहरात राहणे ही धोक्याची घंटा असू शकते. परंतु तंबाखू च्या वापरापेक्षा ते अधिक भयंकर आहे किंवा नाही , हे शंकास्पद आहे.
मूलतः धूम्रपान बंद करून फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. तुम्ही कितीही धूम्रपान केलेले असेल आणि ते थांबवल्याने , फुफ्फुसाच्या कर्करोगा व्यतिरिक्त इतर आजार निर्माण होण्याची शक्यता कमी होते. उदा. ह्रुदयरोग , मधुमेह , आॉस्टिओपोरोसीस.
हे अजिबात खरे नाही. ज्यांनी धूम्रपान करणे थांबवले आहे , त्यांना खूप चांगले परिणाम मिळालेले आहेत.
मुळीच नाही. शस्त्रक्रियेचा वापर स्टेज १ आणि २ मध्ये केला जातो. ऑपरेशन ने कॅन्सर पुर्णपणे क्युअर होतो. ट्यूमर मोठा असेल वा त्याचा शरीरातील इतर अवयवांत प्रसार झाला असेल तर केमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी यासारखे सहाय्यक उपचार, कर्करोगाच्या पेशी कमी करण्यात सहाय्यभूत ठरतात.
सहसा चुकीचे विधान आहे. जेव्हा कर्करोग तज्ज्ञ फुफ्फुसाचा कर्करोग लवकर ओळखतात , तेव्हा त्यात ६०% पैक्षा जास्त बरा होण्याचा दर समाविष्ट असतो. आजच्या प्रगत काळामध्ये कर्करोगाचे विश्लेषण दिर्घकाळ क्षमतेने टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे.
कॅरोटीनाॉइडस आणि व्हीटॅमीन Cसारखे आहारातील कर्करोग प्रतिबंधक घटक फुफ्फुसाच्या कर्करोगा पासून सुरक्षीत ठेऊ शकतात.
एकमेव नक्कीच नाही . कौटुंबिक इतिहास , वायु प्रदुषणाचा संपर्क , रेडाॉन चां संपर्क, अॅस्बेस्टाॉस चां सम्पर्क, छातीवरील पूर्वीचे रॅडीएशन आणि फुफ्फुसाचा जुनाट आजार यांचा समावेश होतो.
सरतेशेवटी :
फुफ्फुसाच्या कर्करोगाचा उपचार रूग्णाच्या प्रकारावर , स्टेजवर तसेच एकंदर आरोग्यावर अवलंबून असतो. संभाव्य उपचारांमध्ये आॅपरेशन , केमोथेरपी , रॅडीएशन , आणि इम्युनोथेरपी यांचा समावेश होतो. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांतील कोणाला सतत चिंतेची लक्षणं दिसत असल्यास , तुम्ही त्वरीत कॅन्सरच्या तज्ज्ञ ढाॉक्टरला भेट दिली पाहिजे.
– डाॅ. प्रतीक पाटील
कर्करोग तज्ञ
कन्सल्टंट, सह्याद्री हाॅस्पीटल
हेल्थ बे क्लिनीक, बाणेर