- 26/03/2024
- Dr. Pratik Patil
- 0 Comments
- Blog
रुग्ण मार्गदर्शिका – हाडाचे विक्षेपण होतेवेळी होणाऱ्या वेदनेविषयी जागृती आणि महत्त्व
विक्षेपण म्हणजे काय?
‘विक्षेपण’ हा शब्द कर्करोगाचा त्याच्या मूळ जागेपासून (मुख्य जागा, किंवा कर्करोग जिथून सुरु झाला ती जागा) शरीराच्या दुसऱ्या भागात होणाऱ्या प्रसाराचे वर्णन करण्यासाठी वापरतात. विक्षेपणात मूळ कर्करोगाच्या जागेपासून पेशी वेगळ्या होतात आणि रक्तप्रवाहातून किंवा लसीका संस्थेमधून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. स्तन कर्करोगापासून होणारे हाडाचे विक्षेपण स्तन कर्करोग पेशींमुळे होते. हाड हे स्तनाचा कर्करोग पसरण्याचे सर्वसामान्य ठिकाण आहे.
हाडाच्या विक्षेपणाची लक्षणे कोणती आहेत'?
लक्षणे कर्करोगाच्या संचयाची जागा आणि त्याचा आकार यानुसार बदलू शकतात. लक्षणे काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी उद्भवू शकतात. तुम्हाला कोणती नवी लक्षणे दिसून आली किंवा असलेल्या लक्षणांमध्ये कोणताही नवा बदल दिसला तर तुमच्या डॉक्टरांना आणि नर्सेसना त्याविषयी सांगणे अतिमहत्त्वाचे असते.
*हाडांच्या विक्षेपणात सर्वाधिक उद्भवणारे लक्षण म्हणजे वेदना. ही वेदना सहसा सतत उद्भवत असते आणि दुखरी असते आणि एखादी क्रिया करताना वाढू शकते आणि तिच्यामुळे झोपताना त्रास होऊ शकतो. कर्करोगामुळे हाडांना होणारी वेदना आर्थायटिस किंवा स्नायूंवर आलेल्या ताणासारख्या सामान्य आजारांमुळे होणाऱ्या वेदनेपेक्षा खूप वेगळी असते.
फ्रैक्चर (हाड मोडणे):
कर्करोगाच्या संचयामुळे हाड अशक्त होऊ शकते आणि यामुळे ते मोडू शकते (फॅक्चर होऊ शकते). हाडात कर्करोग असला की ते फार जोर न देताच मोडू शकते. हे पडल्यानंतर किंवा इजा झाल्यावर होऊ शकते, पण हे रोजच्या ज्ञामान्य क्रिया करतानाही होऊ शकते ज्यामुळे अचानक, तीव्र वेदना उद्भवू शकते.
मज्जारज्जू दाबला जाणे:
कण्याच्या हाडांमधील (ज्यांना कशेरू म्हणतात) कर्करोगामुळे मज्जारज्जूतून वाहणाऱ्या चेतांवर दाब येऊ शकतो. मज्जारज्जूवर दाब पडण्याची लक्षणे अशी असू शकतात :
- सततची पाठदुखी जी खोकल्यावर, शिंकल्यावर किंवा ताण दिल्यावर वाढू शकते.
- पाय बधीर होणे किंवा अशक्त होणे, ज्यामुळे चालताना त्रास होतो
- मूत्राशयावर किंवा मलाशयावर नियंत्रण ठेवणेअवघड जाणे
- पक्षाघात (क्वचित)
हायपरकॅल्सेमिया (उच्च कॅल्शियम):
हाडामधील कर्करोगामुळे रक्तामधील कॅल्शियमच्या पातळ्या वाढू शकतात. ह्यामुळे उद्भवणारी लक्षणे आहेत – तहान वाढणे, जास्त वेळा लघवीस जाणे, उलटी होणे, बद्धकोष्ठ किंवा गोंधळ. पण हे खूप क्वचित होते आणि सहज नियंत्रित करता येते.
हाडांच्या विक्षेपणांचे निदान कसे होते?
कोणत्याही नवीन लक्षणांविषयी तुमच्या डॉक्टरांना सांगणे हे पहिले पाऊल आहे. तुमचे डॉक्टर Best oncologist in Pune तुमची शारीरिक तपासणी करतील आणि काही चाचण्या करून घेण्यास सांगतील. हाडाच्या विक्षेपणाचे ठिकाण आणि आकार जाणून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक चाचण्या असतात, ज्यांमध्ये पुढील रक्तचाचण्यांचा आणि इमेजिंगचा समावेश होतो.
- एक्स-रे:अनेकदा साध्या एक्स-रे मधूनही हाडाचे विक्षेपण दिसू शकते, पण तुमचे डॉक्टर दुसऱ्या प्रकारचे स्कॅन करण्यास सागू शकतात.
- हाडाचा स्कॅन: हाडाचा स्कॅन ही एक न्युक्लिअर मेडिसिन टेस्ट (आण्विक औषध चाचणी) असते. कर्करोगाने बाधित हाडांच्या पेशींकडे आकर्षित होणारा एक किरणोत्सर्गी (रेडिओअॅक्टिव्ह) द्राव शिरामधून आत पाठवला जातो.
- हाडाचा स्कॅन: स्कॅनर अनेक चित्र टिपतो, आणि हाडांमध्ये जिथे जिथे कर्करोग असेल त्या जागा गडद उमटतात, कधीकधी त्या जागांना हॉट स्पॉट्स’ म्हणतात. स्कॅनर अनेक चित्रे टिपतो, आणि हाडांमध्ये जिथे जिथे कर्करोग असेल त्या जागा गडद उमटतात, कधीकधी त्या जागांना ‘हॉट स्पॉट्स’ म्हणतात.
- कंप्युटराइझ्ड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन: ह्या इमेजिंग प्रक्रियेतून तुमच्या शरीराची चित्रे अधिक तपशिलात दिसतात कारण ही चित्रे वेगवेगळ्या कोनांमधून घेतली जातात. ह्याचा वापर एखाद्या विशिष्ट हाडाचे किंवा जागेचे जास्त तपशील दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो. हाडाचे विक्षेपण असल्याचा संशय असणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी हा स्कॅन आवश्यक नसतो.
- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅन:हे स्कॅन्स ठरावीक हाडांची तपशीलवार चित्रे टिपण्यासाठी एक्स-रे ऐवजी रेडिओ लहरींचा आणि शक्तिशाली चुंबकाचा वापर करतात. हाडाचे विक्षेपण असल्याचा संशय असणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी हा स्कॅन आवश्यक नसतो.
- पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पेट) स्कॅन: हे आणखी एक आण्विक स्कॅनिंग तंत्र आहे ज्याचा विक्षेपणे शोधण्यासाठी कधीकधी वापर केला जातो. यात तुमच्या शरीराचे 3-मितीय (3डी) चित्र तयार केले जाते, ज्यासाठी इंजेक्शन दिल्यानंतर दिसणाऱ्या रेडिओ लहरी वापरतात. पेट स्कॅन हाडांची विक्षेपणे शोधण्यासाठी नेहमी वापरले जात नाहीत.
हाडांच्या विक्षेपणावर उपचार कसा केला जातो ?
हाडाची विक्षेपणे बरी करणे शक्य नसले, तरी सहसा ती जीवघेणी नसतात. हाडाच्या विक्षेपणांचे निदान झाल्यानंतरही अनेक स्त्रिया अनेक वर्षे सक्रिय जीवन जगतात. हाडाच्या विक्षेपणावरील उपचाराचे उद्दिष्ट तुमची वेदना किंवा फ्रैक्चर यांसारखी लक्षणे कमी करून तुमचे जीवनमान सुधारणे हे असते.
हाडाच्या विक्षेपणावर तीन प्रकारचे उपचार उपलब्ध असतात:
- वेदना नियंत्रित करण्यासाठीचे उपचार
- हाडांसाठीचे स्थानिक उपचार (उदा. रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया) जे एका हाडाला किंवा जागेला लक्ष्य करतात.
- कर्करोगावरील पद्धतशीर उपचार, जे पूर्ण शरीरावर काम करतात.
वेदना नियंत्रित करण्यासाठीचे उपचार:
वेदनेपासून प्रभावी आराम मिळणे अतिशय महत्त्वाचे असते. वेदनेवरील औषध वेदना तीव्र होण्यापूर्वीच सुरु केले असेल तर उत्तम काम करते. तुम्हाला जाणवणाऱ्या कोणत्याही नव्या किंवा वाढलेल्या वेदनेविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना वेळीच सांगायला हवे. वेदना कमी करण्यात औषधांचा आणि औषध व्यतिरिक्त इतर उपचारांचा समावेश होतो.
वेदनाशामक औषधे (अॅनलजेसिक)
विविध प्रकारच्या वेदनेवर उपचार करण्यासाठी अनेक विभिन्न प्रकारची औषधे उपलब्ध असतात. ती गोळ्यांच्या रूपात, द्रवरूपात, इंजेक्शन मार्फत, पॅचेस किंवा सपोझिटरीच्या रूपात घेता येऊ शकतात. तुमचे डॉक्टर पॅरासिटमॉल किंवा दाहविरोधी औषधे (उदा. आयब्युप्रोफेन) घेण्यास सुचवू शकतात ज्यांचा सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या हाडाच्या वेदनेवर उपचार करण्यास उपयोग होतो. कोडेन आणि मॉर्फिनसारखी जास्त शक्तिशाली औषधे मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या वेदनेवर उपचार करण्यासाठी अतिशय सुरक्षित आणि प्रभावी असतात.
औषध व्यतिरिक्त उपचार
कर्करोगाच्या वेदनेचा बंदोबस्त करण्याचे इतर अनेक मार्गही उपलब्ध आहेत, त्यांपैकी काही :
- विश्रांतीची तंत्रे
- अॅक्युपंक्चर
- शरीराच्या बाधित आणि अबाधित भागांना सौम्य मालिश
- गरम आणि थंड शेक
- मित्रांकडून आणि परिवाराकडून मानसिक आधार
- वेदनेच्या औषधांचा वापर करण्याच्या सर्वांत प्रभावी मार्गांविषयीचे शैक्षणिक कार्यक्रम
- प्रशिक्षित सल्लागारांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी चालवलेले आधार कार्यक्रम.
हाडांवरील स्थानिक उपचार:
- रेडिएशन थेरपी: हा उपचार अतिशक्तिशाली एक्स-रे वापरून हाडांमधील कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो. तुमच्या प्रारंभिक निदानानंतर तुमच्या स्तनांसाठी किंवा छातीसाठी ह्या प्रकारचे रेडिएशन तुम्हाला आधीच मिळालेले असू शकते. हाडांच्या वेदनेसाठीचा हा सर्वांत प्रभावी उपचार आहे आणि ह्यामुळे फॅक्चर आणि पाठीच्या कण्यावर दाब पडणे टाळण्यासही मदत होऊ शकते. सहसा रेडिएशन छोट्या प्रमाणात (किंवा मात्रेत) एका दिवशी किंवा अनेक दिवस दिले जाते. तुमच्या लक्षणांनुसार, जागेनुसार आणि कर्करोगाच्या तीव्रतेनुसार आणि तुम्ही आधी कधी रेडिओथेरपी घेतली आहे का त्यानुसार हे बदलू शकते. ह्या उपचारातील तज्ज्ञ रेडिएशन ऑकोलॉजिस्ट असतो. तुम्हाला किती रेडिएशनची आवश्यकता आहे आणि ते किती काळ घ्यावे लागणार आहे ह्याविषयी स्वतंत्रपणे सल्ला दिला जाईल.
- शस्त्रक्रिया: तुमचे डॉक्टर अशक्त हाडे मोडू देणे टाळण्यासाठी किंवा आधीच मोडलेले हाड स्थिर करण्यासाठी शस्त्रक्रिया सुचवू शकतात. ह्यामध्ये पिना आणि बारीक दांड्यांनी हाडांना धातूचा आधार दिला जातो. अशा प्रकारची शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक सर्जन करतात.
हाडांच्या विक्षेपणावरील उपचार किती प्रभावी असतात?
जरी हाडांच्या विक्षेपणासाठीचे सध्याचे उपचार सर्व कर्करोग पेशी पूर्णपणे काढून टाकण्यास असमर्थ असले, तरी हाडांची विक्षेपणे असणाऱ्या अनेक स्त्रिया अनेक वर्षे उत्तम जीवनमानासह जगू शकतात. हाडाच्या विक्षेपणाचा तुमच्या प्रकृतीवर होणारा परिणाम व्यक्तिनुरुप बदलतो आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, तो कुठे पसरला आहे आणि विविध उपचारांना तुम्ही प्रतिसाद कसा देत आहात त्यावर अवलंबून असतो. वेदना आणि इतर लक्षणे नियंत्रित करून तुम्हाला तुमच्या दैनंदिन क्रियांचा शक्य तेवढा आनंद घेता यावा हे उपचाराचे मुख्य उद्दिष्ट आहे.